शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 9 जुलै 2020 (08:39 IST)

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतले 'हे' आहेत

गरिबांना पुढील पाच महिने मोफत धान्य, मजुरांना भाड्याने घरे, सामान्य विमा कंपन्यांमध्ये १२ हजार ७५० कोटी रुपयांची गुंतवणूक आदी महत्त्वपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले.
 
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मागील ३ महिन्यांत ८१ कोटी लोकांना दरमहा ५ किलो धान्य मोफत मिळाले आहे. तसेच, जे धान्य २ रुपये आणि ३ रुपयांना मिळत आहे, तेही मिळाले आहे. पण हे धान्य मोफत मिळाले आहे. याचा अर्थ असा की गेल्या ३ महिन्यांत प्रत्येक व्यक्तीला १५ किलो धान्य मिळाले, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी यासंदर्भात घोषणा केली. आज मंत्रिमंडळाने याची अंमलबजावणी केली आहे. ही योजना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार असून त्यामध्ये एका व्यक्तीला ५ किलो मोफत धान्य मिळेल, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले.
 
सरकारने आणखी एक योजनेचा विस्तार केला आहे. जे छोटे व्यवसाय आहेत. ज्याठिकाणी १०० पेक्षा कमी कर्मचारी आहेत आणि त्यातील ९० टक्के नोकरदारांना १५००० पेक्षा कमी पगार आहेत. अशा कर्मचार्‍यांना प्रत्येक महिन्यात सरकारने १२ टक्के पीएफ जमा केला आहे. याचा फायदा ३ लाख ६६ हजार उद्योगांना झाल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.
 
पंतप्रधान गृहनिर्माण योजनेंतर्गत १०७ शहरांमध्ये १ लाख ८ हजार छोटी घरे तयार आहेत. ही घरे मजुरांना भाड्याने देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मजुरांना भाड्याने स्वस्त घरे मिळाली नव्हती. मात्र, आता सरकारने त्यांच्यासाठी हा निर्णय घेतला आहे. तसेच, देशात तीन सामान्य विमा कंपन्या आहेत. त्यात सरकार १२ हजार ७५० कोटी रुपयांची गुंतवणूक करेल, अशीही माहिती यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.