शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 8 मार्च 2018 (11:51 IST)

एनडीएमधून टीडीपी बाहेर पडला

तेलुगू देसम पक्षाने (टीडीपी) एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी याबाबत घोषणा केली. अशोक गजपती राजू आणि वाय. एस. चौधरी या दोन्ही केंद्रीय मंत्र्यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचे आदेश चंद्राबाबूंनी दिले आहेत. 

“राजकारणातील एक जुना-जाणता नेता म्हणून आणि एक जबाबदार राजकारणी म्हणून पंतप्रधानांपर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केला, जेणेकरुन त्यांना आमचा हा निर्णय सांगता आला असता. मात्र आमच्यासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता”, असेही यावेळी चंद्राबाबूंनी सांगितले. 

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी  स्पष्ट केले होते की, आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देणं शक्य ही. विशेष राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर विशेष आर्थिक पॅकेज मिळतं, जे प्रत्येक राज्याला देणे शक्य नसते. अर्थमंत्री म्हणाले होते, “तेलंगणा आणि आंध्रच्या विभाजनावेळी आंध्रला विशेष दर्जा देण्याचं वचन दिले होते. त्यावेळी विशेष राज्याचा दर्जा देण्याची तरतूद होती. मात्र 14 व्या वित्तीय आयोगाच्या अहवालानुसार अशाप्रकारे दर्जा देऊ शकत नाही.”

आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा दिला जाऊ शकत नाही, या अर्थमंत्री अरुण जेटलींच्या वक्तव्यानंतर चंद्राबाबूंच्या राजकीय हालचाली वाढल्या होत्या आणि अखेर त्यांनी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घोषित केला.