शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 15 फेब्रुवारी 2017 (15:09 IST)

'ते' 34 चार्टर्ड अकाऊंटंट्‌स सरकारच्या रडारवर

नोटबंदीनंतर काळा पैसा पांढरा करण्यासाठी मदत करणाऱ्या 34 चार्टर्ड अकाऊंटंट्‌स सरकारच्या रडारवर असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान या 34 सीएची नावे सरकारने चार्टर्ड अकाऊंटंट इन्स्टिट्यूटकडे पाठवली असून या 34 जणांची सखोल चौकशी करण्याचे आदेश आले आहेत.या चौकशीचा अहवाल सरकारला पाठवण्याचे निर्देशही देण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्याच आठवड्यात सरकारने जारी केलेल्या माहितीनुसार, तब्बल 559 जणांनी 3900 कोटी रूपयांचा काळा पैसा बनावट कंपन्यांच्या माध्यमातून पांढरा केला आहे. यासाठी त्यांना तब्बल 54 सीएंनी मदत केल्याची माहितीही केंद्र सरकारने जारी केली होती.