गुरूवार, 28 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 11 जुलै 2023 (15:29 IST)

छतरपूर : शाळेतील प्रार्थनेदरम्यान दहावीच्या विद्यार्थ्याला हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू

A student of class 10 died
गेल्या काही महिन्यांपासून भारतात हृदयविकाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मग तो म्हातारा असो वा लहान मूल. हृदयविकाराच्या झटक्याला सर्व वयोगटातील लोकबळी पडत आहेत. याच क्रमाने मध्य प्रदेशातील छतरपूरमधूनही हृदयविकाराच्या झटक्याची बातमी समोर आली आहे.  येथील एका शाळेत सोमवारी सकाळी 17 वर्षीय विद्यार्थी प्रार्थनेदरम्यान अचानक कोसळला. 

छतरपूरच्या महर्षी विद्या मंदिर शाळेत शिकणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्याला अचानक  शाळेत प्रार्थना सुरू असताना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर अचानक तो बेशुद्ध पडला. शाळेतील सहकाऱ्यांनी त्याला सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. मात्र सार्थकला वाचवता आले नाही. 
 
शाळेच्या कर्मचाऱ्यांनी त्याला सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंब हळहळले आहे.मृत सार्थक टिकरिया हा प्रसिद्ध उद्योगपती आलोक टिकरिया यांचा मुलगा होता. महर्षी विद्या मंदिर शाळेत तो दहावीचा विद्यार्थी होता. 
 
 सार्थक नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी 6 वाजता उठला आणि तयार होऊन शाळेत गेला. सकाळी 7.30 ते 8.00 च्या सुमारास शाळेतील सर्व मुले अभ्यासापूर्वी प्रार्थनेसाठी रांगेत उभी होती. त्यानंतर अचानक सार्थक जमिनीवर पडला. मुलांना काही समजण्यापूर्वीच सार्थक बेशुद्ध पडला. 
 
शाळेच्या कर्मचाऱ्यांनी मुलाला सीपीआर देण्याचा प्रयत्न केला आणि कुटुंबीयांना कळवले. कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले, मुलाला तात्काळ जिल्हा रुग्णालयात आणण्या आले मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. सार्थक तीन भावंडांमध्ये सर्वात लहान होता. त्याला एक मोठा भाऊ आणि मोठी बहीण नोएडा आणि भुवनेश्वरमध्येशिकत आहे. सार्थक यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी सिंघडी नदीवरील मुक्तिधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

17 वर्षांचा मुलगा गमावलेल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला यावेळी धक्का बसला आहे. त्याच्या वडिलांनी  मुलाचे डोळे दान करण्याचा निर्णय घेतला.  
 
Edited by - Priya Dixit