1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 10 एप्रिल 2023 (18:00 IST)

तामिळनाडूत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची समाजकंटकांकडून तोडफोड

ANI
तामिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यात कुल्लीतुराईजवळील वट्टाविलाई येथे रविवारी रात्री उशिरा अज्ञात समाजकंटकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. 
या संदर्भात कन्याकुमारीचे पोलिस अधीक्षक हरी कृष्ण प्रसाद म्हणाले, “तोडफोड झाली की नाही हे आम्हाला माहीत नाही. मूर्तीचे काही नुकसान झाले आहे. आम्ही गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा शोध घेण्यासाठी एक पथक नेमला आहे.  कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आम्ही अधिक तपास करत आहोत."
 या घटनेनंतर संतप्त नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, कन्नियाकुमारी जिल्ह्यातील कुल्लीतुराईजवळील वट्टाविलाई येथे लोकांचा जमाव जमला आणि त्यांनी मूर्तीची तोडफोड करणाऱ्या बदमाशांना अटक करण्याची मागणी केली. यावेळी आंदोलकांकडून ‘भारत माता की जय’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषणाही देण्यात आल्या.
व्हिडिओमध्ये आंदोलकांसोबत पोलिसांचा फौजफाटाही तैनात होताना दिसत आहे. पोलिसांनी खराब झालेल्या मूर्ती कापडाने झाकली आहे. 
 
 
Edited By - Priya Dixit