शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 16 ऑक्टोबर 2021 (12:25 IST)

छत्तीसगड: रायपूर रेल्वे स्टेशनवर स्फोट, 6 सीआरपीएफ जवान जखमी

छत्तीसगडच्या रायपूरमधील रेल्वे स्थानकावर शनिवारी स्फोट झाला.या अपघातात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) सहा जवान जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर उभी असलेल्या सीआरपीएफच्या विशेष ट्रेनमध्ये सकाळी 6.30 वाजता स्फोट झाला. स्फोटक साहित्य एका डब्यातून दुसऱ्या डब्यात नेले जात असताना हा स्फोट झाला. या घटनेत जखमी झालेल्या 6 जवानांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
 
रायपूर पोलिसांनी सांगितले की, सीआरपीएफच्या 211 बटालियनचे जवान जम्मूहून विशेष ट्रेनमध्ये जात होते. त्यांच्याबरोबर ग्रेनेड ठेवले होते, जे बॉक्समध्ये ठेवले होते. तोच बॉक्स एका बोगीच्या फर्शीवर पडला, ज्यामुळे जबरदस्त स्फोट झाला आणि 6 जवान जखमी झाले.
 
ही ट्रेन ओडिशामधील झारसुगुडा येथून जम्मूला जात होती. या घटनेत चार जण किरकोळ जखमी झाले. एकाला खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांच्या वर  उपचार सुरू आहेत.
 
सीआरपीएफ 211 बटालियनचे जवान या ट्रेनने जम्मूला जात होते. त्यात सामान्य प्रवासी नव्हते. रायपूर येथून ही ट्रेन सकाळी 7.15 वाजता रवाना झाली आहे.