रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 10 जुलै 2018 (16:30 IST)

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 'हा' समज ठरवला खोटा

'एखाद्या मुख्यमंत्र्यानं नोएडाला भेट दिली तर त्याची खुर्ची त्याला लवकरच सोडावी लागते' असं बोलल जात. मात्र मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी  हा समज खोटा ठरवलाय. गेल्या सहा महिन्यांत त्यांनी पाचव्यांदा नोएडाला भेट दिलीय.
 
बसपा आणि सपाच्या कार्यकाळात मुख्यमंत्र्यांसाठी नोएडाला येणं 'अशुभ' असल्याच्या वावड्या उठत होत्या. त्यामुळे अनेक मुख्यमंत्र्यांनी नोएडाला भेट देणं टाळलंही. परंतु, योगींनी मात्र या अफवांना भिक घातली नाही. २३ डिसेंबर २०१७ रोजी ते पहिल्यांदा नोएडाला दाखल झाले होते... त्यानंतर दोन दिवसांनी २५ डिसेंबर २०१७ रोजी पंतप्रधानांनी मेट्रोचं उद्घाटन केलं तेव्हाही योगी आदित्यनाथ तिथं उपस्थित होते. 
 
त्यानंतर ८ जुलै रोजी त्यांनी सिंचन विभागाच्या कामाच्या समिक्षेसाठी नोएडा गाठलं... आणि ९ जुलै रोजी पाचव्यांदा ते सॅमसंग कंपनीच्या उद्घाटनालाही दाखल झाले. उल्लेखनीय म्हणजे केंद्रात आणि उत्तरप्रदेशात भाजप सरकार स्थानापन्न झाल्यानंतर नोएडाला पंतप्रधान मोदींनी चार वेळा भेट दिलीय तर मुख्यमंत्री योगींनी पाच वेळा गेले आहेत.