शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 28 जुलै 2021 (10:31 IST)

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडात ढगफुटी,4 ठार, 40 ते 50 बेपत्ता

जम्मू विभागातील किश्तवाड्यातील गुलाबगड चशौती आणि  हंजंर भागात ढगफुटी मुळे भयानक कहर झाला आहे.आज पहाटे हंजंर येथे ढगफुटी झाली, त्यामुळे 12 घरे मातीमध्ये दबली गेली.
 
या घरात राहणाऱ्या कुटूंबातील सुमारे 40 ते 50 सदस्य अद्याप बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे.मात्र, 4 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. संपूर्ण भागात रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
 
याबाबत माहिती देताना डी.सी. किश्तवाड म्हणाले की, हंजंर गाव हा सुमारे 20 किमी लांबीचा डोंगराळ भाग आहे. या दुर्गम भागात वाहतुकीची सुविधा नाही. बचाव दल मदत करायला निघाला आहे परंतु त्यांना तिथ पर्यंत पोहोचण्यास थोडा वेळ लागू शकतो. म्हणूनच तिथल्या वास्तविक परिस्थितीबद्दल काहीही सांगता येत नाही.
 
आजूबाजूच्या भागातून अशीच माहिती मिळाली आहे की, हंजंरमधील 12 घरांचे हे शहर पूर मुळे पूर्णपणे वाहून गेले आहे. हे 4 मृतदेह बचाव पथकाला वाटेत सापडले आहेत. आतापर्यंत बचावकार्य स्थानिक लोकच करीत आहेत. लवकरच लष्कराचे जवान आणि बचाव दल घटनास्थळी पोहोचतील.