रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 6 फेब्रुवारी 2017 (14:03 IST)

कर्नल निजामुद्दीन यांचे निधन, ते आझाद हिंद सेनेचे शेवटचे सैनिक

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेतील शेवटचे सैनिक कर्नल निजामुद्दीन यांचं निधन झाले आहे. ते 116 वर्षांचे होते. उत्तर प्रदेशातील आजमगडच्या मुबारक भागातील ढकवा इथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कर्नल निजामुद्दीन यांचा आशीर्वाद घेऊनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. निजामुद्दीन यांनी अखेरच्या क्षणापर्यंत आझाद हिंद सेनेचे ओळखपत्र सांभाळून ठेवलं होतं. पंतप्रधान मोदी यांनी मागील वर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित फाईल सार्वजनिक करण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या निर्णयाचं कर्नल निजामुद्दीन यांनी स्वागत केलं होतं.