रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 3 ऑक्टोबर 2024 (14:20 IST)

स्वच्छता मोहिमेवर प्लॉट स्वच्छ करण्यावरून गोंधळ, गोळीबारात तिघांचा मृत्यू

इंफाळ : स्वच्छता मोहीम अंतर्गत उखरूलमध्ये बुधवारी एका प्लॉटच्या स्वच्छतेला घेऊन दोन गटांमध्ये वाद झाला. व या गोळीबारामध्ये मणिपुर राइफल्सचे जवान सोबत तीन जणांचा मृत्यू झालेला आहे.तसेच पाच जण गंभीर जखमी झाले आहे. शहरामध्ये आदेश लागू करून एक दिवसाकरिता इनरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. 
 
अधिकारींनी सांगितले की, दोन्ही गट नागा समाजाचे आहे आणि ते जमिनीवर दावा करतात. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त फौज पाठवण्यात आली होती. तसेच या गोळीबारामध्ये तीन जणांचा मृत्यू झालेला आहे, तसेच आमदारांनी गावकऱ्यांना शांतता राखण्याचे आणि चर्चेद्वारे समस्या सोडवण्याचे आवाहन केले आहे.
 
पोलिसांनी सांगितले की, सुरक्षा दलांनी इतर गोष्टींबरोबरच 10 मोठे आयईडी, 11 मध्यम आकाराचे आयईडी, 42 देशी बनावटीचे ग्रेनेड, सात 36 हातबॉम्ब, दोन चिनी ग्रेनेड आणि 34 पेट्रोल बॉम्ब तेंगनौपाल जिल्ह्यातील सेनम गावातून जप्त केले आहे. तसेच याशिवाय एक देशी बनावटीची बंदूक, एक रायफल आणि पिस्तूल, दोन पॉम्पी गन आणि डिटोनेटर जप्त करण्यात आले आहे. 

Edited By- Dhanashri Naik