1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 सप्टेंबर 2024 (18:59 IST)

माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर दहशतवाद्यांनी रॉकेट डागले, एकाचा जागीच मृत्यू, 5 जण जखमी

मणिपूर मध्ये सध्या वातावरण तापलेच आहे. राजधानी इंफाळ मध्ये शुक्रवारी संशयितांनी एका निवासी भागावर रॉकेट डागले.त्यात एका वृद्धाचा जागीच मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. 

सदर घटना विष्णुपुर जिल्ह्यातील मोइरांग भागात घडली. या हल्ल्यात मणिपूरचे माजी मुख्यमंत्री मेरेमबम कोइरॅन्ग यांच्या घराच्या आवारात रॉकेट पडला आणि मोठा स्फोट झाला. घटनेच्या वेळी एक वृद्ध घराच्या आवारात काही धार्मिक विधीची तयारी करत होते.रॉकेटच्या हल्ल्यात त्यांचा जागीच हल्ला झाला. तर एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीसह पाच जण जखमी झाले. 

हे रॉकेट INA (इंडियन नॅशनल आर्मी) मुख्यालयापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर पडला. ही तीच जागा आहे जिथे 14 एप्रिल 1944 रोजी INA चे लेफ्टनंट कर्नल शौकत अली यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र भारताचा तिरंगा फडकावला होता.

हल्लेखोरांनी हल्ल्यात बॉम्बचा वापर केला असून दोन इमारतीचे नुकसान झाले आहे. मणिपूर मध्ये झालेल्या या हल्ल्यामुळे सुरक्षाविषयक गंभीर आव्हाने समोर आली आहे. या हल्ल्याचा तपास पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा कडून केला जात आहे. 
Edited by - Priya Dixit