काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीची हत्या, आरोपी ताब्यात
कर्नाटकच्या हुबळी येथे हुबळी- धारवाड महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकाच्या मुलीची हत्या करण्यात आली मुलीच्या कॉलेज कॅम्पसमध्ये ही घटना घडली. नेहा हिरेमठ असे मृत महिलेचे नाव आहे. आरोपी नेहाच्या कॉलेजचा विद्यार्थी आहे. फैयाज असे त्याचे नाव आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून त्यात फयाज तरुणीवर चाकूने हल्ला करताना दिसत आहे. हत्येनंतर तो फरार झाला होता. मात्र नंतर पोलिसांनी त्याला अटक केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नेहा स्थानिक नगरसेवक निरंजन हिरेमठ यांची मुलगी होती.
आरोपी बेळगाव जिह्यातला होता. तो बीसीएच्या प्रथम वर्षी परीक्षेत नापास झाला. तो गेल्या सहा महिन्यांपासून महाविद्यालयत येत नव्हता. गुरुवारी 18 एप्रिल रोजी तो धारधार शस्त्र घेऊन आला आणि आरोपीने नेहाचा पाठलाग करून तिची हत्या केली. नंतर त्याने घटनास्थळ वरून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र प्रत्यक्षदर्शींनी त्याला ताब्यात घेतले. नेहाला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
मयत नेहा हिरेमठ हुबळीच्या एका महाविद्यालयात एमसीएच्या प्रथम वर्षात होती. आरोपीने एकतर्फी प्रेमातून तिची हत्या केली. नेहाचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी प्रकरणाचा गुन्हा दाखल केला असून आरोपी फैयाजला अटक केली असून त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. पुढील तपास सुरु आहे.
Edited By- Priya Dixit