सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 8 एप्रिल 2024 (10:08 IST)

मोदींसाठी देवीला बोट अर्पण केलं

narendra modi
देशाचे पंतप्रधान हे जगप्रसिद्ध आहे. भारतात देखील मोदींचे चाहते आहे.त्यांचे भक्त आहे.  मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान व्हावे या साठी एका व्यक्तीने देवीला आपले बोट कापून दिले आणि नवस केला आहे. अरुण वेर्णेकर असे या मोदी भक्ताचे नाव आहे. अरुण कर्नाटकात राहतात. त्यांनी आपल्या घरात मोदींचे मंदिर बांधले आहे.

ते नियमितपणे पूजा करतात. त्यांनी बोट कापून रक्ताने काली देवी कडे मोदी बाबांचे रक्षण कर अशी विनंती केली आहे. मोदी बाबा सबसे महान असे लिहिले आहे. ते मोदींचे भक्त असून त्यांनी मोदींचे भरभरून कौतुक केलं आहे. 
मोदी पंतप्रधान झाल्यापासून जम्मू काश्मीर मध्ये शांतता आहे, शेजारच्या देशाचे कुरघोड्या कमी झाले आहे. देशाच्या विकासासाठी मोदी हे पुन्हा पंतप्रधान बनण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

Edited By- Priya Dixit