बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 24 सप्टेंबर 2024 (21:17 IST)

नर्सिंग कॉलेजमध्ये कंत्राटदाराने विद्यार्थिनीचा विनयभंग केला, आरोपीला अटक

rape
उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील नर्सिंग कॉलेजमध्ये टाईल्सचे काम करणाऱ्या एका कंत्राटदाराने विद्यार्थिनीला बंदुकीचा धाक दाखवून विनयभंग केला.आरोपीकडे बंदूक असूनही विद्यार्थ्याने धाडस दाखवत त्याच्या हातावर चावा घेतला. नंतर विद्यार्थिनीने आरडाओरडा केला. तिच्या आवाजाला ऐकून कर्मचारी धावत आले आणि आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.आरोपीची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. 
 
शाहजहांपूर येथे चौक कोतवाली परिसरातील एका नर्सिंग कॉलेजमध्ये टाईल्सचे काम करणारा सैजना गावातील आरोपी सुरेश हा टाईल्स लावण्याचे काम करत होता.सोमवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास विद्यार्थिनी वॉशरूमला गेली असता कंत्राटदार सुरेश तिच्या मागे आला आणि बंदुकीचा धाक दाखवत तिचा विनयभंग केला.

तिने विरोध केला असता त्याने जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपीने तिचे तोंड बंद केल्यावर तिने प्रसंगावधान राखत त्याच्या हाताचा चावा घेतला नंतर त्याने तिला सोडून दिले. विद्यार्थिनीने आरडा ओरड केला आणि अलार्म लावले.तिची आवाज ऐकून कॉलेजचे कर्मचारी धावत आले आणि यांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

त्याचा साथीदार पळून गेला. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपास केला.आरोपीची कारागृहात रवानगी करण्यात आली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
Edited By - Priya Dixit