बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 24 सप्टेंबर 2024 (20:07 IST)

पाचवीच्या विद्यार्थिनीवर हॉटेल मध्ये नेऊन सामूहिक बलात्कार, एकाला अटक

rape
लखनौच्या सरोजिनी नगर भागात सोमवारी शाळेतून घरी परत येतांना इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनीचा कार मधून अपहरण करून तिला हॉटेलात नेऊन  दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. तिच्यावर बलात्कार करून तिचा व्हिडीओ बनवला आणि तो व्हायरल करण्याची  धमकी दिली.नंतर आरोपी मुलीला घराजवळ सोडून पसार झाले. 

या प्रकरणात मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेण्यास सुरु केले असता पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. हॉटेलच्या सीसीटीव्हीचे फुटेज मिळाले असून आरोपीची चौकशी करण्यात येत आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लखनौच्या सरोजिनी नगर परिसरात इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीची बॅग हिसकावली आणि तिने विरोध केल्यावर तिचा अपहरण करून तिला कार मधून हॉटेल  मध्ये बळजबरी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि त्याच्या व्हिडीओ बनवून व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी एका आरोपीला अटक केली असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरु आहे. आरोपींवर कडक कारवाई केली जाईल अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. 
Edited By - Priya Dixit