मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

रामदेव बाबांचे वादग्रस्त विधान, झाले ट्रोल

पतंजली फेम रामदेव बाबा एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. दाक्षिणात्य सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय पेरियार रामास्वामी यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे रामदेव बाबांना नेटिझन्सनी चांगलंच ट्रोल केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे पतंजलीच्या उत्पादनांचा देखील लोकांनी जाहीर निषेध सुरू केला आहे. त्यामुळे रामदेव बाबांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यांनी आपल्या वक्तव्यासाठी जाहीर माफी मागावी, अशी मागणी आता केली जाऊ लागली आहे.  
 
एका जाहीर कार्यक्रमामध्ये रामदेव बाबांनी पेरियार स्वामींबद्दल वक्तव्य केलं होतं. ‘सध्या एक मूलनिवासी आंदोलन सुरू आहे. म्हणे आम्ही मूलनिवासी आहोत आणि बाकी सगळे बाहेरून आले आहेत. रामास्वामी पेरियारसारखी काही नास्तिक माणसं जे इश्वराला मानणाख्यांना मूर्ख, इश्वराचा प्रचार करणाऱ्यांना धूर्त आणि धर्माला विष म्हणतात त्यांचा सध्या जोरदार प्रचार सुरू आहे. हा वैचारिक आतंकवाद फार धोकादायक आहे. हा वैचारिक आतंकवाद देशाचे तुकडे करण्याचा प्रयत्न करत आहे’, असं रामदेव बाबा एका जाहीर कार्यक्रमात बोलताना म्हणाले होते. याच वक्तव्यावरून त्यांना ट्रोल केलं जात असून त्यांच्या पतंजलीच्या उत्पादनांवर देखील बहिष्कार टाकण्याची मागणी नेटिझन्स करत आहेत.