मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 मार्च 2020 (10:12 IST)

'या' लोकांचे वेतन कापू नका : मोदी

corona virus
करोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सगळेच देश आपल्या परिने प्रयत्न करत आहेत. मात्र भारतीय नागरिकांचं विशेष कौतुक करावं लागेल कारण त्यांनी या करोनाचा मुकाबला अत्यंत प्रभावीपणे केला आहे. अजूनही करत आहेत. असं असलं तरीही या संकटातून आपण पूर्णपणे बाहेर पडलो अशी स्थिती नाही. अशात ज्या व्यक्ती कामावर न येता रजेवर आहेत. ज्यांना घरी रहावं लागलं आहे त्यांचं वेतन कापण्यात येऊ नये. सगळ्या सरकारी आणि खासगी संस्थांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे आवाहन केलं आहे.  
 
आपल्या देशावरच नाही तर जगावरही या महारोगामुळे आर्थिक संकट कोसळलं आहे. अशात जो नोकरदार माणूस घरी राहून आपली आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घेतो आहे त्याचा पगार कोणत्याही परिस्थितीत कापला जाऊ नये असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.