Cough syrup तामिळनाडूमध्ये मोठी कारवाई, कंपनीचे मालक रंगनाथन यांना अटक
मध्य प्रदेश सरकारने मध्य प्रदेशमध्ये विषारी सिरपमुळे होणाऱ्या मुलांचा मृत्यू प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. एफआयआर नोंदवल्यानंतर पोलिसांनी तामिळनाडूमधून सिरपचे मालक रंगनाथन यांना अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार कफ सिरपची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या मालकाविरुद्ध कारवाई करण्यासाठी मध्य प्रदेश पोलिसांचे एक विशेष पथक ८ ऑक्टोबर रोजी तामिळनाडूत दाखल झाले होते. व तामिळनाडूमधील कंपनीच्या मालकाला पोलिसांनी अटक केली आहे. श्रीसन फार्मा या औषध कंपनीचे मालक एस. रंगनाथन यांची चौकशी सुरू आहे. अलीकडेच, पोलिसांनी कंपनीचे मालक आणि प्रिस्क्राइबर डॉक्टर प्रवीण सोनी यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. मध्य प्रदेशात, छिंदवाडा, बैतुल आणि इतर भागात कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे आतापर्यंत २० मुलांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूंनंतर मध्य प्रदेश सरकारने सिरपवर बंदी घातली. याव्यतिरिक्त, पंजाब आणि राजस्थान या राज्यांमध्ये सिरपवर बंदी घालण्यात आली आहे.
या प्रकरणात, छिंदवाडा पोलिस अधीक्षक अजय पांडे यांनी सांगितले की, श्रीसन फार्माचे मालक एस. रंगनाथन यांना ८ ऑक्टोबरच्या रात्री अटक करण्यात आली. रंगनाथन यांना चेन्नई येथील न्यायालयात हजर केले जाईल आणि ट्रान्झिट रिमांड घेतल्यानंतर छिंदवाडा येथे आणले जाईल. अशी माहिती समोर आली आहे.
Edited By- Dhanashri Naik