शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 7 ऑक्टोबर 2017 (12:54 IST)

युपीत पतीसमोर महिलेवर बलात्कार

योगी मुख्यमंत्री असलेल्या युपी मध्ये रोज कायदा मोडला जातो आहे. यामध्ये एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथे भोपा कस्बे भागात  पतीसमोर महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये पीडित महिला पतीसोबत गाडीवरून गावातून परतत असताना ही घटना घडली आहे. यामध्ये  धक्कादायक असे की  पीडित महिला व  तिच्या पतीसोबत त्यांचं तीन महिन्याचं बाळ देखील होते.  मुलाला डॉक्टरांकडे घेऊन हे दांपत्य घरी परतत होते. न परतत असताना ही घटना घडली असून  पोलीस अधीक्षक अजय सचदेव यांनी ही माहिती दिली आहे. चार लोक कारमध्ये आले होते. त्यांनी  महिला तिच्या नवऱ्याला  घेरले होते. तर नवजात बालकाला  त्यांच्याकडून हिसकावून घेतल होते. तर या महिला  पीडितेच्या पतीला बांधून ठेवलं होते. त्यानंतर मुलाच्या मानेवर चाकू ठेवला आणि  बंदूकीचा धाक दाखवून महिलेला ऊसाच्या शेतात नेऊन सामूहिक बलात्कार केला आहे. युपी साठी ही  मोठी लाजिरवाणी घटना घडली आहे. यामध्ये आधीच युपीत सरकारवर अनेक आरोप होत असतांना ही घटना घडली आहे.