सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 13 डिसेंबर 2022 (10:07 IST)

मुलीच्या लग्नात नाचताना वडिलांचा मृत्यू

marriage
उत्तराखंडमधील अल्मोडा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे मुलीच्या लग्नात वडिलांचा डान्स फ्लोअरवर पडून मृत्यू झाला. लग्नाचा आनंद काही क्षणात शोकात बदलला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत साठा घेतला
  
  मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. दुसरीकडे वधूच्या नातेवाईकांनी  हल्द्वानी येथे जाऊन शोकाकूल वातावरणात विवाह पार पाडला. यावेळी वधूच्या मामाकडून कन्यादान करण्यात आले.
 
मिळालेल्या माहितीनुसार, हल्दवानी येथील मीज हॉलमध्ये रविवारी एका मुलीचे लग्न ठरले होते. विवाह सोहळा पार पाडण्यासाठी वधूपक्षातील लोकांना हल्द्वानी येथे जावे लागले. याआधी मुलीच्या मेहेंदी, हळदीसह सर्व विधी तिच्या अल्मोडा येथील घरी केले जात होते. विधी दरम्यान लोक रात्री उशिरा नाचत होते. दरम्यान, वधूच्या वडिलांनीही जोरदार नृत्य केले.
 
डॉक्टर म्हणाले - हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
दरम्यान, वधूचे वडील नाचत असताना डान्स फ्लोअरवर पडले. घाईघाईत त्यांना बेस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे विवाहितेच्या घरात शोककळा पसरली. मुलीचे हात पिवळे होण्याच्या काही तास आधी वडिलांचा मृत्यू झाला.
Edited by : Smita Joshi