गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 19 जून 2024 (18:12 IST)

बालाजी वेफरच्या पॅकेटमध्ये मृत बेडूक सापडला, अन्न विभागाने केली तपासणी

dead frog
गुजरातमध्ये विविध खाद्यपदार्थांमध्ये कीटक आढळून आल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. अशीच एक घटना जामनगरमधून उघडकीस आली असून, बालाजी वेफरचे पॅकेट उघडले असता त्यात एक मृत बेडूक आढळून आला. याप्रकरणी अन्न विभागाने वेफर्सचे नमुने घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.
 
जास्मिन पटेल यांनी जामनगर महापालिकेच्या अन्न शाखेशी संपर्क साधला
मिळालेल्या माहितीनुसार, जामनगर येथील पुष्करधाम सोसायटीमध्ये राहणाऱ्या जास्मिन पटेल नावाच्या व्यक्तीच्या भाचीने काल एका प्रोव्हिजन स्टोअरमधून बालाजी वेफर्सचे पाकीट खरेदी केले. जस्मिन पटेलचा आरोप आहे की, जेव्हा ती घरी घेऊन गेली तेव्हा पॅकेटमध्ये एक मृत बेडूक आढळून आला.
 
रात्री वेफरमधून बेडूक निघाल्यावर तिने ते एका पॅकेटमध्ये ठेवले आणि सकाळी जास्मिन पटेल यांनी जामनगर महापालिकेच्या अन्न शाखेशी संपर्क साधला.
 
चार वर्षाच्या मुलीला काही झाले तर जबाबदार कोण?
या संदर्भात जास्मिन पटेल यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, त्यांचे याबद्दल दुकानदाराशी आणि एजन्सीशीही बोलणे झाले. ते कस्टमर केअरशी बोलले पण प्रतिसाद मिळाला नाही, आम्ही कस्टम केअरला फोन केला, मॅडम म्हणाल्या, तुम्हाला हवे ते करा, अशा केसेस येत राहतात. माझ्या नऊ महिन्यांच्या मुलीला आणि माझ्या भावाच्या चार वर्षांच्या मुलीला काही झाले तर जबाबदार कोण?
 
वेफर्सच्या पाकिटाला बेडूक अडकलेला आढळला
जामनगरचे अन्न सुरक्षा अधिकारी डी.बी. परमार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, वेफर्सच्या पाकिटात मृत बेडूक असल्याची माहिती दूरध्वनीवरून मिळाल्यावर आम्ही येथे आलो. इथे येऊन तपासले असता, वेफरच्या पाकिटात एक बेडूक चिटकल्याचे आढळले. सध्या या एजन्सीकडून आजच्या बॅचच्या पॅकेटचे नमुने घेण्याची प्रक्रिया केली असून पुढील तपास सुरू आहे.