गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017 (12:16 IST)

डॉक्टरांनी मृत जाहीर केले, अन ती महिला जिवंत निघाली

dead-patient-begins-to-move-in-casualty-ward-of-kgmu

लखनऊमध्ये  रुग्णालयात दाखल असलेली ५२ वर्षाची महिला मृत असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. त्यासंबंधी तिच्या नातेवाईकांनाही सांगण्यात आले. त्यानंतर  नातेवाईकांनी अंत्यसंस्काराची तयारीही केली. दरम्यान ती महिला जिवंत असल्याचे समोर आले. 

या घटनेमध्ये तालकटोरा येथील रहिवासी असलेल्या शमसुन निसा (५२) यांची प्रकृती खराब झाली होती. त्यानंतर त्यांना केजीएमयू ट्रामा सेंटरमध्ये उपचारासाठी आणण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना दुसऱ्या मजल्यावरील विभागात दाखल केले. त्यानंतर  ईसीजी टेक्निशिअननी तपासणी केली. त्यासंबंधीचा अहवाल कनिष्ठ डॉक्टरांना देण्यात आला. या रिपोर्टमध्ये शमसुन यांच्या हृदयाचे ठोके बंद असल्याचे लिहिले होते. डॉक्टरांनी त्या रिपोर्टच्या आधारे शमसुन याच्या नातेवाईकांना त्या मृत असल्याचे सांगितले.