मंगळवार, 13 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 मार्च 2017 (09:47 IST)

साताऱ्याचे जवान दीपक घाडगे शहीद

deepak ghadage
सातारा तालुक्यातील फत्यापूर येथील जवान दीपक जगन्नाथ घाडगे (वय २७) हे शहीद झाले. त्यांच्या पश्चात पत्नी निशा, आई शोभा, वडील जगन्नाथ, मुलगा शंभू (४), मुलगी परी (१), विवाहित बहीण असा परिवार आहे. जम्मू काश्मीरमधील पूँछ सेक्टरमध्ये घाडगे कार्यरत होते. पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी दुपारी भारतीय चौकीवर गोळीबार केला. त्यावेळी पाकिस्तानी सैन्यांना प्रत्त्युतर देत असताना झालेल्या चकमकीत दीपक घाडगे यांना वीरमरण आले. ते शहीद झाल्याचे वृत्त समजताच फत्यापूरसह परिसरात शोककळा पसरली. त्यांचे पार्थिव आज शुक्रवारी संध्याकाळपर्यंत साताऱ्यात येईल, अशी महिती सूत्रांनी दिली.