शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 19 मे 2022 (12:57 IST)

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह अंतर्राष्ट्रीय योग दिवस काउंटडाउन कार्यक्रमात सामील झाले

rajnath singh
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज दिल्लीत आयोजित एका विशेष योग कार्यक्रमात सहभाग घेतला. 
आगामी आंतरराष्ट्रीय योग दिन 2022 च्या आधी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्ली येथे एका विशेष योग कार्यक्रम अंतर्राष्ट्रीय योग दिवस काउंटडाउन यात भाग घेतला. यावेळी ते म्हणाले की, सध्याच्या जीवनशैलीत ताणतणाव दूर करण्यात योगाची भूमिका महत्त्वाची आहे. संरक्षण मंत्री म्हणाले की, कोविड महामारीच्या काळात योगामुळे लोकांमध्ये प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत झाली.
 
त्यांच्यासोबत संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट आणि लष्कराचे अधिकारीही योग कार्यक्रमात सहभागी झाले होते. आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरा केला जातो.