सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 18 मे 2022 (15:54 IST)

दोन बसची समोरासमोर धडक, 30 जखमी ,बस अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद ,पहा व्हिडीओ

तामिळनाडूच्या सेलम जिल्ह्यात मंगळवारी दोन बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या घटनेत अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह 30 जण जखमी झाले आहेत. ज्यांना सालेम आणि एडप्पाडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसरीकडे, ही घटना बसमध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही बस एडप्पाडी-शंकरी महामार्गावरील कोळीपणई बसस्थानकाजवळ आल्या असता त्यांची समोरासमोर धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की समोरचा भाग उडून गेला आणि बसचा चालक आपल्या सीटवरून उडी मारून पलीकडे गेला. या घटनेत जखमी झालेल्या तीन प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचबरोबर सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे.