मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 20 जुलै 2023 (13:05 IST)

जिमच्या ट्रेडमिलमध्ये करंट, वर्कआउट करणाऱ्या तरुणाचा मृत्यू

treadmill
photo: symbolic
Delhi News दिल्लीतील रोहिणी येथील जिममध्ये विजेचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. जिमच्या ट्रेडमिलमध्ये करंट लागल्याने रोहिणी सेक्टर-19 मध्ये राहणार्‍या सक्षम प्रूथी नावाच्या 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. वर्कआउट करताना ट्रेड मिलमध्ये करंट वाहू लागला.
 
सक्षम रोहिणी भागातील सिम्प्लेक्स फिटनेस झोनमध्ये व्यायाम करण्यासाठी जात होते. मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर पोलिसांना मृत्यूचे नेमके कारण कळले. मृत सक्षम प्रुथीने बीटेक केले असून ते गुरुग्राममधील एका कंपनीत काम करत होते.
 
पोलिसांनी जिम मॅनेजर अनुभव दुग्गलला अटक केली आहे. दोषी व्यक्तीची हत्या आणि यंत्रसामग्रीच्या बाबतीत निष्काळजीपणा या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.