मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 23 ऑक्टोबर 2021 (17:51 IST)

Delhi CM अरविंद केजरीवाल राम लल्लांच्या दर्शनासाठी अयोध्येला जाणार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिवाळीपूर्वी उत्तर प्रदेशातील अयोध्येला भेट देणार आहेत. त्यांचा दौरा 26 ऑक्टोबर रोजी असेल. अरविंद केजरीवाल रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाऊ शकतात. आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्ष चांगलाच सक्रिय झाला आहे. राज्यात पक्षाने निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे.
 
गेल्या महिन्यात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया अयोध्येच्या दौऱ्यावर गेले होते आणि त्यांनी तेथे राम लल्लालाही भेट दिली होती. मनीष सिसोदिया यांनी दर्शनानंतर सांगितले होते की, यूपीमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी त्यांनी रामललासमोर एक अर्ज सादर केला आहे.