शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 22 डिसेंबर 2021 (17:25 IST)

दिल्लीत ओमिक्रॉनचा इशारा, ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या उत्सवांवर बंदी; कोणते नियम वाचा

गतवर्षीप्रमाणेच यावेळीही कोरोना विषाणूने ख्रिसमस आणि नववर्षाच्या उत्सवात व्यत्यय आणण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉन या नवीन प्रकारामुळे राज्य सरकारांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. कोरोनाच्या नवीन प्रकाराचा प्रभाव दिल्लीत दिसू लागला असून, त्यानंतर राजधानीत ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे कोणतेही सेलिब्रेशन होणार नाही. यासंदर्भात डीडीएमएने बुधवारी आदेश जारी केला आहे.
 
डीडीएमएने जिल्हा दंडाधिकार्‍यांना ख्रिसमस, नवीन वर्षाच्या समारंभासाठी दिल्लीत जमणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच कोविड-19 चा झपाट्याने प्रसार होण्याची शक्यता असलेल्या दिल्लीतील क्षेत्रे ओळखण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. याशिवाय दुकाने/कामाच्या ठिकाणी नो मास्क/नो एंट्रीचे काटेकोरपणे पालन केले जाणार  याची काळजी घेण्यासही सांगण्यात आले आहे.
 
विशेष म्हणजे दिल्लीत कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या वाढत आहे. काही काळापूर्वी दिल्लीत दररोज ५० हून कमी कोरोना रुग्णांची नोंद होत होती, तर आता ही संख्या १०० च्या पुढे गेली आहे. मंगळवारी दिल्लीत 102 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली. यावेळी कोरोना संसर्गाचा दर ०.२ टक्के होता. त्याचवेळी, मंगळवारी कोरोना संसर्गामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला, यासह दिल्लीतील कोरोनामुळे एकूण मृतांची संख्या 25,102 वर पोहोचली आहे.