शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 4 सप्टेंबर 2024 (15:14 IST)

पूजा खेडकर यांनी दाखल केलेले अपंगत्व प्रमाणपत्र तपासात बनावट आढळले

माजी आयएएस ट्रेनी अधिकारी पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या स्टेटस रिपोर्ट मध्ये पूजा खेडकर यांनी दाखल केलेले अपंगत्व प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या स्टेट्स रिपोर्ट मध्ये पूजा खेडकर ने नागरी सेवा परीक्षा 2022 आणि 2023 दरम्यान बनावट प्रमाणपत्र दाखल केले आणि त्यात तिचे नाव बदलले होते. हे प्रमाणपत्र महाराष्ट्रातून दिल्याचा दावा देखील खोटा आहे. त्या म्हणाल्या ते प्रमाणपत्र त्यांना वैद्यकीय प्राधिकरण अहमदनगर, महाराष्ट्राने दिले. पोलिसांनी या बाबत प्राधिकरणाकडून माहिती घेतली असता त्यांनी कोणतेही अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यास नकार दिला असून ते अपंगात्वाचे प्रमाणपत्र महाराष्ट्र मधून आलेले नाही. 
 
पूजा खेडकर यांनी UPSC परीक्षेसाठी निवड करताना विशेष सवलत मिळवण्यासाठी अपंगत्व प्रमाणपत्राचा वापर केला होता. इतकेच नाही तर यूपीएससी परीक्षेत कमी गुण मिळूनही पूजा खेडकर हिने अपंगत्व प्रमाणपत्राच्या आधारे विशेष सवलत मिळाल्याने यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली. पूजा खेडकरने यूपीएससी परीक्षेत 841वा क्रमांक मिळवला आहे. अशा परिस्थितीत न्यायालयात स्टेटस रिपोर्ट दाखल करण्यासोबतच आता दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकरचे अपंगत्व प्रमाणपत्र बनावट असल्याचे मान्य केले आहे, जे महाराष्ट्रात जारी करण्यात आले नव्हते. 
Edited by - Priya Dixit