रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 ऑगस्ट 2024 (11:43 IST)

ट्रेनी आयएएस पूजा खेडकरच्या वडिलांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

Puja Khedkar
ट्रेनी आयएएस पूजा खेडकर हिचे वडील दिलीप खेडकर यांच्यावर पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात सरकारी कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
सरकारी कामकाजात दिलीप खेडकर अडथळा आणत असल्याची तक्रार बंडगार्डन पुणे पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. पूजा खेडकर या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात ट्रेनी आयएएस अधिकारी होत्या.त्यावेळी पूजा खेडकरांना स्वतंत्र केबिन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांवर दबाब आणला होता. 
या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी तहसीलदारांच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला असून तहसीलदाराला जबाब नोंदविण्यासाठी बोलवण्यात आलं. यामुळे पूजा खेडेकरांच्या वडिलांची अडचण वाढू शकते. 
 
पूजा खेडकरला जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र दालन मिळावं, कार्यालयातील कामकाजासाठी शिपाई उपलब्ध करून द्यावं असा दबाब दिलीप खेडेकरांनी तहसीलदारांवर दबाब आणला होता. त्यामुळे आता तहसीलदारांच्या तक्रारी नंतर बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. बंडगार्डन पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लेकीचे हट्ट पुरवणे दिलीप खेडेकरांना चांगलेच भोवले आहे. 
Edited by - Priya Dixit