सोमवार, 18 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

जिल्हा बॅंकेवरील निर्बंध उठणार

नोटबंदीनंतर जिल्हा बँकेना सर्व व्यवहार केंद्राने बंद केले होते. मात्र आता त्यांना मोठा दिलासा मिळण्याचे संकेत केंद्र सरकारने दिले आहे. केंद्राच्या या निर्णयाने आता जिल्हा बँकांवरची नोटबंदी उठणार आहे. यामुळे जिल्हा बँकांमध्ये पैसे भरता आणि काढता येऊ शकणार आहेत.
 
जिल्हा बँकामध्ये जुन्या नोटा स्वीकारण्यास मनाई करण्यात आली आहे. अर्थमंत्री अरुण जेटलींकडे सर्वपक्षीयांनी विनंती केली होती . तर दुसरीकडे  सुप्रीम कोर्टात याबद्दलच्या याचिकेवर सुनावणी झाली आहे. जिल्हा बँकांकडे 5 हजार कोटींच्या जुन्या नोटा आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्याची शक्यता आहे. याबाबत रिझर्व्ह बँक मनाई मागे घेऊ शकते. तर कोर्टात  केंद्राने त्या प्रकारचे स्वष्टीकरन दिले आहेत.