मंगळवार, 18 मार्च 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 18 मार्च 2025 (16:51 IST)

मोमोज प्रेमींनो सावधान! कारखान्यात आढळले कुत्र्याचे डोके, मोमोज चाचणीसाठी पाठवले

Chandigarh News: पंजाब मधील महानगरपालिकेच्या वैद्यकीय पथकाने मोहालीतील चिकन दुकानांवर छापा टाकला आणि सुमारे ६० किलो दुर्गंधीयुक्त गोठवलेले चिकन जप्त केले. या पथकाने अन्न नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंडही ठोठावला आहे.तसेच या छाप्यादरम्यान एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. मोमोज बनवणाऱ्या कारखान्याच्या फ्रीजरमध्ये कुत्र्याचे डोके सापडल्याचा दावा करण्यात आला होता.
या प्रकरणात, मोहालीचे सहाय्यक अन्न सुरक्षा आयुक्त  म्हणाले की, कारखाना संचालकाविरुद्ध कठोर कारवाईसाठी पोलिसांना कळविण्यात आले आहे. वितरणासाठी मोमोज आणि स्प्रिंग रोल बनवणाऱ्या कारखान्यांची तपासणी केली जात आहे जेणेकरून कुत्र्याचे मांस वापरले गेले आहे का हे शोधता येईल. कुत्र्याच्या डोक्यासारखे दिसणारे कुजलेले मांस तपासणीसाठी पशुवैद्यकीय विभागात पाठवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. मोमोज, स्प्रिंग रोल आणि चटणीचे नमुनेही पाठवण्यात आले आहे. छाप्यादरम्यान, अन्न सुरक्षा पथकाला गोठवलेल्या मांसासह एक क्रशर मशीन देखील सापडली. रविवारी प्रशासनाला या प्रकरणाची माहिती देण्यात आली. या संदर्भात संपूर्ण अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकारी यांना देण्यात आले आहे. यासोबतच, नोंदणी नसलेल्या विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई केली जात आहे.  
Edited By- Dhanashri Naik