खासगी कंपनीची बस नाल्यात पडली, आठ ठार, 35 जखमी
पंजाबमधील भटिंडा येथे शुक्रवारी एक मोठी दुर्घटना घडली. भटिंडा येथील तलवंडी साबो रोडवरील जीवन सिंग वाला गावाजवळ एका खासगी बसला अपघात झाला. बसचे नियंत्रण सुटून नाल्यात पडली. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर सुमारे 35 जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर सर्वत्र गोंधळ आणि आरडाओरड सुरु होता. जखमींना तळवंडी साबो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींवर सिव्हिल हॉस्पिटल भटिंडा येथे उपचार सुरू आहेत.
शुक्रवारी दुपारी स्थानिक प्रवाशांना घेऊन 52 आसनी खाजगी बस सरदुलगढ येथून भटिंडासाठी निघाली होती. तलवंडी साबो येथून बस प्रवास करत जीवनसिंग वाला या गावापासून काही अंतरावर असलेल्या भंगीबंदरजवळून जाणाऱ्यानाल्याजवळ सर्वत्र चिखल झाल्यामुळे रास्ता निसरडा झाला होता बस चालकाचा बसवरील ताबा सुटून बस नाल्यात पडली या अपघातामुळे बस मध्ये प्रवास करणाऱ्या 8 प्रवाशींचा मृत्यू झाला. तर 35 प्रवासी गंभीर जखमी झाले.
आरडाओरडा ऐकून एनडीआरएफच्या टीमने घटनास्थळी पोहोचून मदत आणि बचावकार्य सुरू केले. या वेळी जिल्हा पोलिस प्रशासनासह सामाजिक संस्थांना माहिती दिल्यानंतर त्यांनी जखमींना बसमधून बाहेर काढण्याचे काम सुरू केले. यावेळी आठ मृतांसह इतर सुमारे 35 जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. जखमींना तत्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले.घटनेची माहिती मिळताच आजूबाजूचे लोक मदतीसाठी सर्वप्रथम तेथे पोहोचले.
यानंतर एनडीआरएफची टीमही घटनास्थळी पोहोचली आणि बचावकार्य हाती घेतले.सूत्रांनी वर्तवली असून, या बस अपघातात सध्या आठ जणांचा मृत्यू झाला आहे, मात्र या अपघातातील मृतांची संख्या आठहून अधिक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अद्यापपर्यंत मृतांबाबत जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही.
Edited By - Priya Dixit