रविवार, 7 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 28 डिसेंबर 2020 (09:37 IST)

हे काही पंतप्रधानपद नाही, शरद पवार यांची UPA अध्यक्ष होण्याची इच्छा नसावी: चिदंबरम

Don't think Sharad Pawar wants to be UPA chairperson: Chidambaram
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे UPA अध्यक्षपद सोपवण्यासंबंधी चर्चेमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. शरद पवार यांची संयुक्त पुरोगामी आघाडीचं अध्यक्ष होण्याची इच्छा असेल असं मला वाटत नाही असं पी चिदंबरम यांनी म्हटलं आहे. 
 
पी चिदंबरम म्हणाले की हे काही पंतप्रधानपद नाही आणि स्वत: शरद पवार यांची यूपीए अध्यक्ष म्हणून जाहीर केलं जावं अशी इच्छा नसावी. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देशात विरोधी पक्ष खिळखिळा असून यूपीए मजबूत करण्यासाठी शरद पवार यांच्याकडे नेतृत्व सोपवावं अशी भूमिका मांडली आहे. 
 
दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी पहिल्यांदाच यावर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांचीही UPA अध्यक्ष म्हणून आपल्या नावाची घोषणा किंवा निवड व्हावी अशी इच्छा नसेल. जेव्हा बैठक होईल तेव्हा योग्य व्यक्तीची निवड केली जाईल.