मंगळवार, 13 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 27 जुलै 2017 (11:11 IST)

‘डीडी’ चा लोगो नव्या रूपात येणार

doordarshan

सरकारी वृत्तवाहिनी ‘दूरदर्शन’ अर्थात ‘डीडी’ आपला लोगो नव्या रूपात सादर करणार आहे. यासाठी सर्व भारतीयांना संधी देण्याची योजना डीडीने आखली आहे. सध्याचा दूरदर्शनचा लोगो हा ५८ वर्षे जुना लोगो आहे. त्यामुळे आता नव्या लोगोसाठी स्पर्धा घेण्याचे डीडीने जाहीर केले आहे. यासाठी तब्बल १ लाख रूपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. त्यासाठी डीडी सर्व भारतीयांना या स्पर्धेसाठी आंमत्रित करीत आहे. यामध्ये भाग घेण्यासाठी आपल्याला १३ ऑगस्टपर्यंत अर्ज करावा लागणार आहे. यासाठी एका व्यक्तीची किंवा एका संस्थेची एकच प्रवेशिका ग्राह्य धरली जाणार आहे. तसेच ही स्पर्धा जिंकल्यानंतर संबंधीत व्यक्ती किंवा संस्थेला आपल्या लोगोच्या डिझाइनवर कॉपीराईटचा अधिकार ठेवता येणार नाही. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी दूरदर्शनच्या वेबसाईटवर अधिक माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.