बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 11 एप्रिल 2018 (10:19 IST)

आता पत्रलेखनाऐवजी ई-पत्र लेखनाचा अभ्यास

दहावीच्या अभ्यासक्रमात आता पारंपारिक पत्रलेखनाऐवजी ई-पत्र या नव्या प्रकाराचा समावेश करण्यात आलाय. हे इ-पत्र, इ -मेलचाच एक प्रकार असेल. यंदाच्या दहावीच्या शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रमात बदल करण्यात आलाय. नव्या अभ्यासक्रमासंबंधीत पुस्तकं बाजारपेठेत दाखल झाले आहे. दहावीच्या अभ्यासक्रमात पत्रलेखन हमखास विचारले जाते.

सध्या वाढत्या संगणकीकरनाच्या युगात इ-मेलची आवश्यकता लक्षात घेवून हा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागानं घेतलाय. नेमका इ-मेल कसा लिहायचा याबाबत अनेक प्रश्न शालेय विद्यार्थ्यांना पडायचे. त्यामुळेच पत्रलेखनाऐवजी ई-पत्र या नव्या प्रकाराचा समावेश करण्यात आलाय. याविषयी राज्यातील शिक्षकांची मत जाणून घेण्यात आली. काळाशी सुसंगत अशी पत्रलेखन पद्धती असावी यावर सगळ्यांचं एकमत झालं आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.