रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017 (14:37 IST)

शिक्षकांवर केला कोयत्याने जीवघेणा हल्ला

केस कापायला सांगितले म्हणून  अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने शिक्षकां कोयत्याने हल्ला केला आहे. दोन शिक्षक गंभीर जखमी झाले आहे. पुणे येथील  वाघोली  हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर  उपचार सुरु आहेत.

यामध्ये  जोगेश्वरी माता माध्यमिक-उच्च माध्यमिक विद्यालयात आज सकाळी ही घटना घडली आहे. या हल्ल्यात शिक्षक  दर्शन चौधरी आणि धनंजय आबनावे गंभीर जखमी झाले आहेत. 

यामध्ये हे विद्यार्थी बेशिस्त वागत होते त्यामुळे  तर मोठे  केस कापण्यासाठी दोन्ही शिक्षकांनी आरोपी विद्यार्थ्याला वर्गात सांगितले होते. वर्गात सर्वांसमोर बोलले असा राग धरला होता त्यामुळे  प्रार्थना झाल्यानंतर शिक्षक वर्गात जात असताना, विद्यार्थ्याने त्यांच्यावर मागून कोयत्याने हल्ला केला आहे.हल्ल्यानंतर विद्यार्थी पसार झाला आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. .