मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मुंबईत पुन्हा बॉम्बस्फोट घडवण्याचा कट

भारताला हवा असलेला कुख्यात गुंड दाऊद इब्राहीम मुंबईत पुन्हा एकदा 1993 सारखे बॉम्बस्फोय घडवून आणण्याचे कटकारस्थान रचत असल्याचे उघड झाले आहे.
 
दाऊदचा पाकिस्तानात असलेला भाऊ आणि भारतातील त्याच्या हस्तकांमध्ये सां‍केतिक भाषेत झालेले संभाषण मुंबई पोलिसांनी उलगडले असून त्यातून या कटाची माहिती मिळाली आहे. दाऊदच्या या कटाची माहिती केंद्र सरकारलाही देण्यात आली आहे. त्यानुसार, मुंबई पोलिसांना दाऊदच्या भारतातील काही हस्तक त्याचे बॉम्बस्फोटाचे कारस्थाने तडीस नेण्यासाठी सक्रिय झाल्याचे कळले.