बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 29 जून 2017 (09:53 IST)

मुस्तफा डोसाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

१९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेला मुस्तफा डोसाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे. छातीत दुखत असल्याच्या कारणामुळे मंगळवारी रात्री उशीरा त्याला जे.जे. हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी अतितणाव आणि छातीतील संसर्गामुळे डोसाला हा त्रास होत असल्याचं डॉक्टरांनी दिली होती. यानंतर हृदयविकाराच्या झटक्यानं मुस्तफा डोसाचा मृत्यू झाल्याची माहिती दुपारी समोर आली.  

दरम्यान, १९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरविण्यात आलेले मुस्तफा डोसा व फिरोज खान यांना याच प्रकरणी फाशी चढविण्यात आलेल्या याकुब मेमनप्रमाणे फाशीची शिक्षा ठोठवावी, अशी मागणी  सीबीआयने विशेष टाडा न्यायालयाला केली होती. या बॉम्बस्फोटात या दोघांची भूमिका मेमनप्रमाणे महत्त्वाची आहे, असा युक्तिवाद सीबीआयने केला.