शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 7 जून 2022 (17:37 IST)

सत्येंद्र जैन आणि त्यांच्या मित्राच्या घरावर ईडीचा छापा, कोटींचे घबाड सापडले

दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांच्या अडचणीत वाढ होत आहे. सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्याच्या आणि त्याच्या साथीदारांच्या जागेवर छापे टाकले. यादरम्यान ईडीने 2.82 कोटींची अघोषित रोकड आणि 1.80 किलो सोनं जप्त केले आहे.
 
 ईडीने मंगळवारी सांगितले की, सोमवारी दिवसभर चाललेली ही कारवाई पीएमएलए अंतर्गत करण्यात आली. या जप्तीनंतर दिल्ली सरकार आणि प्रमुख विरोधी पक्ष भाजप यांच्यातील वाद वाढला आहे. भाजप नेते कपिल मिश्रा म्हणाले की, मुख्यमंत्री केजरीवाल त्यांना (सत्येंद्र जैन) पद्मश्री देण्याबाबत बोलत होते. केजरीवाल यांच्या मते ते प्रामाणिक आहेत. सत्येंद्र जैन यांचा भ्रष्टाचार ही केवळ एक झलक आहे. खरा चेहरा दुसराच आहे.
 
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी ईडीच्या कारवाईवर वक्तव्य केले आहे. सत्येंद्र जैन आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या जागेवर छापे टाकल्याचा आरोप त्यांनी पंतप्रधानांवर केला आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले आहे की, "यावेळी पंतप्रधान पूर्ण ताकदीने आम आदमी पार्टी - विशेषत: दिल्ली आणि पंजाब सरकारच्या मागे आहेत.पण देव आमच्या पाठीशी आहे.
 
प्रयास, इंडो आणि अकिंचन नावाच्या कंपन्यांमध्ये जैन यांचे मोठ्या प्रमाणात शेअर्स होते. रिपोर्ट्सनुसार, 2015 मध्ये केजरीवाल सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर जैन यांचे सर्व शेअर्स त्यांच्या पत्नीला हस्तांतरित करण्यात आले होते. या कंपन्यांचा वापर कोलकाता मधील कंपन्यांना रोख रक्कम पाठवण्यासाठी आणि नंतर कायदेशीररित्या जैन यांना शेअर्स खरेदीच्या नावाखाली पैसे परत करण्यासाठी केला गेला.जैन यांनी 2010 ते 2014 या कालावधीत 16.39 कोटी रुपयांच्या काळा पैशाची अफरातफर केल्याचा आरोप आहे.