'या' मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयावर ईडीची धाड; सापडलं पैशांचं घबाड; अधिकारी चक्रावले
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे निकटवर्तीय हेमंत सोरेन यांचे निकटवर्तीय पंकज मिश्रा यांच्याशी संबंधित मालमत्तांवर सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी छापे टाकले.
मिश्रा आणि त्यांच्याशी संबंधित काही जणांच्या मालमत्तांवर ईडीनं धाडी टाकल्या. एकूण 18 ठिकाणी छापे टाकण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. साहिबगंज जिल्ह्यातील बरहेट आणि राजमलमध्ये धाडी टाकण्यात आल्या.
ईडीनं 18 ठिकाणी छापे टाकत तब्बल 3 कोटी रुपयांची रोकड जप्त केली. ईडीनं हस्तगत केलेल्या नोटांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. खाण घोटाळा प्रकरणात ही कारवाई करण्यात आली.