सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

देशात ईदचा उत्साह

संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात ईदचा सण साजरा केला जात आहे.लखनऊ आणि अलाहाबादमध्ये काल ईदचा चांद दिसला. त्यानंतर मरकजी चांद कमेटीचे अध्यक्ष मौलाना खालिद रशीद फिरंगी यांनी याबाबतची माहिती दिली.

ईदच्या सणाबरोबरच एका महिन्यापासून सुरु असणारा रमजानचा पवित्र महिन्याचाही काल शेवटचा दिवस होता.  ईदनिमित्त हजारो मुस्लिम बांधव मशिदीत जाऊन नमाज पठण करत आहेत. मुंबईतल्या माहिम दर्गावर नमाज पठण करण्यासाठी हजारो मुस्लिम बांधव जमले होते.

नमाज पठण झाल्यानंतर सर्वांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदींनी आपल्या मन की बात कार्यक्रामातून देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही   ट्वीट करुन देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.