1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. email id for black money

काळापैशासाठीच्या ईमेल आयडी प्रचंड प्रतिसाद

सरकारने काळा पैसा आणि काळा पैसाधारकांची माहिती देण्यासाठी लोकांना ईमेल आयडी जाहीर करत माहिती देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद दिला असून फक्त 72 तासांमध्ये जवळपास 4000 ईमेल्स पाठवले आहेत. सराकरकडून शुक्रवारी blackmoneyinfo@incometax. gov.in  हा ई-मेल आयडी जाहीर करण्यात आला होता.

'आम्हाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय कर अधिकारी आणि दुस-या यंत्रणा बँक खात्यांमधील ठेवी तसेच अघोषित संपत्तीसंदर्भात फायनान्शिअल इंटेलिजन्स युनिटच्या माध्यमातून माहिती मिळत आहे' असे अर्थमंत्रालयाच्या अधिका-याने सांगितले आहे. 
पुढील लेख
आरबीआयकडून स्टेट बँकेला 28 कोटींच्या जीर्ण नोटा