शनिवार, 7 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 जून 2022 (23:57 IST)

Encounter in Anantnag: अनंतनागच्या ऋषीपोरामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन जवान जखमी

जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की, अनंतनागच्या ऋषीपोरा भागात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर सुरक्षा दलाच्या पथकाने परिसराला वेढा घातला. स्वत:ला वेढलेले पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला, त्याला प्रत्युत्तर म्हणून लष्करही त्यांना चोख प्रत्युत्तर देत आहे. 
 
आतापर्यंत दहशतवाद्यांच्या संख्येबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. त्याचवेळी या चकमकीत तीन जवानांसह एक नागरिक जखमी झाला. जखमींना विमानाने श्रीनगरला उपचारासाठी हलवण्यात आले आहे.