गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 14 सप्टेंबर 2024 (13:00 IST)

बारामुल्लामध्ये चकमक, तीन दहशतवादी ठार, दोन जवान शहीद

jawan
जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला मध्ये चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले आहे. परिसराला वेढा घातला असून शोध मोहीम सुरु आहे. 
 
बारामुल्लाच्या चक टप्पर क्रेरी पट्टण भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. सुरक्षा दलांनी चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दुसरीकडे किश्तवाडमध्येही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.
 
शुक्रवारी किश्तवाडपासून 45 किमीच्या अंतरावर छात्रू भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्करांचे दोन जवान जखमी झाले. तर दोन जवान गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
 
छात्रू भागातील नैद गावातील वरील परिसरात पिंगनाल दुग्गडा जंगल परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यावर सुरक्षादलांनी ऑपरेशन शाहपुरशाल सुरु केले. सुरक्षादलाचा वेढा अधिक जास्त पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला या गोळीबारात चार जवान जखमी झाले या हल्ल्यात दोघे शहीद झाले तर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरक्षा दलाच्या जवानांनी ताबडतोड गोळीबार करून तीन दहशवाद्यांना ठार केले. चकमकीमुळे किश्तवाडा सह डोडा जिल्ह्यात अलर्ट जारी केले आहे. वाहनांची तपासणी केली जात आहे. 
Edited by - Priya Dixit