1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. Rape with seven year old girl

सात वर्षाच्या मुलीसोबत दुष्कर्म, घर मालकाचा मुलगा लैंगिक अत्याचार करून फरार

राजस्थान मधील बुंदी शहरात सात वर्षाच्या चिमुकलीवर घर मालकाच्या मुलाने लैंगिक अत्याचार केला.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा आरोपी फरार असून त्याला शोधण्यासाठी टीम बनवण्यात आली आहे. बुंदी पोलीस अधिकरींनी सांगितले की ही घटना बुधवारी घडली आहे. तसेच पीडितेच्या कुटुंबाला याची माहिती गुरुवारी समजली. 
 
शुक्रवारी कुटुंबीयांनी बूंदी जिल्हा बाल कल्याण समिति सोबत संपर्क साधला.त्यानंतर बूंदी जिल्हा बाल कल्याण समिति अध्यक्ष यांनी पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी आरोपी विरुद्ध पॉक्सो अंतर्गत आणि भारतीय न्याय संहिता संबंधित कलाम अंतर्गत प्रकरण नोंदवून घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडिताचे कुटुंब बुंदी मध्ये भाड्याने राहते. घर मालकाच्या मुलाने संधी साधून या सात वर्षाच्या मुलीला आपल्या वासनेचे शिकार बनवले. त्यानंतर हा आरोपी फरार झाला असून त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी विशेष टीम तयार केली आहे.
पुढील लेख
Hindi Diwas 2024 Wishes in Marathi हिंदी दिवसाच्या शुभेच्छा