बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शनिवार, 18 डिसेंबर 2021 (10:24 IST)

खळबळजनक ! हुंड्यासाठी पतीने पत्नी आणि मुलांची हत्या केली

पैशासाठी माणूस काहीही करू शकतो हे आज चरितार्थ झाले आहे. बिहारच्या नालन्दा येथे अशीच घटना घडली आहे. येथे एका व्यक्तीने आपल्या पत्नी आणि दोन मुलांची विष देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटने नंतर आरोपी पती हा पसार झाला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गुड्डू पासवान बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील इस्लामपूर च्या चाकियापार गावात आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह राहायचा . त्याचे लग्न 2015 मध्ये झाले होते. त्याला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये झाली .तरीही तो पत्नीला हुंडा आणण्यासाठी म्हणायचा   त्याच्या आणि त्याच्या पत्नीमध्ये दररोज हुंड्यावरून वाद व्हायचे .तो आपल्या पत्नीवर माहेरून हुंडा आणण्यासाठी दबाब टाकायचा . तसेच तिचे शारीरिक मानसिक छळ करायचा. त्याने दररोजच्या वादाला कंटाळून आपल्या  पत्नीला ठार मारण्याचा विचार करून आपल्या पत्नीला आणि दोघा मुलांना  विष देऊन  ठार मारले .
या मध्ये पत्नीचा जागीच मृत्यू  झाला तर दोन्ही मुलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांना घटनेची माहिती मिळतातच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनास पाठविले आहे. घटने नंतर आरोपी पती फरार असून पोलीस  त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी पीडितेच्या सासूला अटक करून चौकशी करीत आहे . पोलिसांनी हुंड्याची मागणी करून हत्या केल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल करून पीडितेच्या सासरच्या आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस तपास करत आहे.