बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 डिसेंबर 2021 (14:47 IST)

आता जन्मावेळी मुलांना मिळणार आधार क्रमांक, जाणून घ्या UIDAI ची संपूर्ण योजना

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) लवकरच रुग्णालयात जन्मलेल्या नवजात बालकांना आधार कार्ड देण्याची तयारी करत आहे. यासाठी रुग्णालयांना लवकरच आधार नोंदणीची सुविधा देण्यात येणार असून, त्याद्वारे ते नवजात बालकांचे आधार कार्ड त्वरित बनवतील.
ANI शी बोलताना UIDAI चे CEO सौरभ गर्ग म्हणाले, "UIDAI नवजात बालकांना आधार क्रमांक देण्यासाठी जन्म रजिस्ट्रारशी करार करण्याचा प्रयत्न करत आहे." "आतापर्यंत, देशातील 99.7 टक्के प्रौढ लोकसंख्येला आधार क्रमांक जारी करण्यात आला आहे. यासाठी सुमारे 131 कोटी लोकसंख्येची नोंदणी झाली असून आता नवजात बालकांची नोंदणी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. 
गर्ग पुढे म्हणाले की, देशात दरवर्षी 2 ते 2.5 कोटी मुले जन्माला येतात. आम्ही त्यांची आधार नोंदणी करण्याच्या प्रक्रियेत आहोत. मुलाच्या जन्माच्या वेळी छायाचित्राच्या क्लिकच्या आधारे आधारकार्ड उपलब्ध करून दिले जाईल, असे ते म्हणाले. UIDAI चे CEO म्हणाले, “आम्ही पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचे बायोमेट्रिक्स घेत नाही, तर ते त्याच्या पालकांपैकी एकाशी, आई किंवा वडिलांसोबत  लिंक करतो.पाच वर्षाचा मुलगा झाल्या नंतर मुलाचे  बायोमेट्रिक्स  घेतले जाईल.
गर्ग पुढे म्हणाले, आम्ही आमच्या संपूर्ण लोकसंख्येला आधार क्रमांक देण्याचा प्रयत्न करत आहोत. गेल्या वर्षी, आम्ही दुर्गम भागात 10,000 शिबिरे लावली होती, जिथे त्यांना सांगण्यात आले की अनेक लोकांकडे आधार क्रमांक नाहीत. यानंतर सुमारे 30 लाख लोकांची आधार नोंदणी झाली.
पहिला आधार क्रमांक 2010 मध्ये दिला गेला
गर्ग पुढे म्हणाले, “पहिला आधार क्रमांक 2010 मध्ये दिला गेला. सुरुवातीला आमचे लक्ष जास्तीत जास्त लोकांची नोंदणी करण्यावर होते आणि आता आम्ही अपडेट करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. दरवर्षी सुमारे 10 कोटी लोक त्यांचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करतात. 140 कोटी बँक खात्यांपैकी 120 कोटी खाती आधारशी जोडण्यात आली आहेत.