प्रेयसीने प्रियकराची चाकू भोसकून हत्या करून मृतदेह बेड खाली पुरला
बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. एका प्रेयसीने आपल्या प्रियकराची चाकू भोसकून त्याचा मृतदेह बेडखाली जमीनीत पुरल्याची घटना घडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आहे
अनैतिक संबंध आणि जमिनीच्या वादातून हा खून झाल्याचे ठाण्याचे एसडीपीओ यांनी सांगितले. संपत पासवान असे या मयत झालेल्याचे नाव असून हा पूर्णिया सादर ठाण्यातील गुलाबबाग येथील रहिवासी होता. मयत संपत हा एक आठवड्यापूर्वी बेपत्ता झाल्याचे समजले होते. त्याचे अपहरण झाल्याची शक्यता वर्तवली जात होती. नंतर जमिनीच्या वादातून त्याचे खून त्याच्या प्रेयसीने करून मृतदेह बेडरूममध्ये पलंगाखाली पुरले. संपत पासवान हा बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात नोंदवली होती. पोलिसांनी तपास सुरु केल्यावर त्याच्या मोबाईलच्या लोकेशन वरून आशादेवी हिला अटक करण्यात आले. तिने आपला गुन्हा कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले .