शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 31 ऑक्टोबर 2021 (16:53 IST)

खळबळजनक बातमी! दलित मुलाशी प्रेमविवाह केल्यावर मुलीचे शुद्धीकरण नर्मदेत अर्धनग्न करून करण्यात आले, कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल

बैतूल : मध्य प्रदेशातील बैतूलमध्ये एका दलित तरुणाशी लग्न केल्यानंतर नर्सिंगच्या विद्यार्थिनीला नर्मदेत स्नान करून शुद्धीकरण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ठार मारले जाण्याच्या भीतीने जोडप्याने पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. प्रकरण जिल्ह्यातील चोपाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. मुलीने पोलिसांना तिच्या कुटुंबीयांपासून वाचवण्याचे आवाहन केले आहे. 
 
24 वर्षीय पीडितेने सांगितले की, 11मार्च 2020 रोजी बैतुलच्या टिकारी भागात राहणाऱ्या 27 वर्षीय दलित तरुणासोबत तिने आर्य समाजात प्रेमविवाह केला. लग्नानंतर कुटुंबीयांनी पोलिसांच्या मदतीने तिला सासरच्या घरातून परत आणले. आता पीडित मुलगी राजगड येथील घरातून पळून वसतिगृहात राहत आहे. 28 ऑक्टोबरला ती हॉस्टेलमधून पळून पतीकडे बैतूलला पोहोचली. जिथे तिने पोलिसात तक्रार केली आहे.
 
तिने तिच्या वडिलांवर आरोप केला आहे की, 18 ऑगस्ट रोजी तिचे वडील तिला नर्मदा नदीवर घेऊन गेले आणि चार लोकांसमोर तिला अर्धनग्न करून तिचे शुद्धीकरण केले. तिला नदीवर जाण्यापूर्वी अंगातील अर्धे कपडे काढण्यास सांगितले आणि तिला उष्टी पुरी खाऊ घातली. तिचे केस काढले आणि तिच्या अंगावर घातलेले कपडे तिथे फेकून देण्यात आले. दलित तरुणाशी लग्न केल्यानंतर शुद्धीकरणासाठी हा प्रकार करण्यात आला.
 
पीडितेनुसार, कलम 21 अंतर्गत राइट टू लाइफ हा माझा मूलभूत अधिकार आहे. या अधिकारांतर्गत आवडीने लग्न करणे हा माझाही अधिकार आहे. समाजाच्या रूढीवादी, जातीयवादी विचारसरणीच्या वर उठून मी लग्न केले.पोलिसांनी तिच्या कुटुंबियांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास करत आहे.